Gram Panchayat Election Result 2022 Live :कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायत मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. सकाळी आठ वाजल्यापासून टपाली मतमोजणीला सुरुवात झाली असून ईव्हीएम मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली.475 पैकी 45 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, 430 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लागली होती. कोल्हापूर जिल्ह्यात कोण बाजी मारणार याचे अपडेट जाणून घ्या तरूण भारत या वेबसाईटवरुन.
कोल्हापुरात ठाकरे गटाने खात उघडलं
खोललं व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंच पदी विजयी. वडकशिवाले ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे यांचा १ मताने पराभव.
-गांधीनगर ग्रामपंचातीत आमदार सतेज पाटलांना धक्का
-महाडिक गटाचे संदीप पाटोळे हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी
-गांधीनगर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल
कागल तालुक्यातील बामणीत पहिला निकाल जाहीर झाला. याठिकाणी मुश्रीफ गटाला धक्का बसला असून सरपंचासह राजे गटाने बाजी मारली.कागल तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच आहे. बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंड
मुश्रीफ गटाला धक्का
कसबा सांगाव ता. कागल याठिकाणी मुश्रीफ गटाला धक्का बसला असून, सरपंचपदी राजे- मंडलिक गटाने बाजी मारली आहे.
भाजपने पहिल्याच निकालात खाते उघडले
करवीर तालुक्याका कावणे गावी शुभांगी प्रतापसिंह पाटील (भाजप) सरपंच पदी.तर भाजपच्या चार आणि काँग्रेसच्या पाच असे बलाबल. भाजपने पहिल्याच निकालात खाते उघडले आहे.
वडणगे गावात नरके गटाची सत्ता
सरपंच संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी यांची सरपंच पदी विजयी.
करवीर तालुका-प्रयाग चिखलीमध्ये भाजप गटाची सत्ता.महाडिक गटाचे रघु पाटील सरपंच पदावर विजयी.हिरवडे खालसात काँग्रेस शेकापचे सरपंच पदाचे उमेदवार नदाफ विजयी.
पन्हाळा तालुका
स्थानिक आघाडी
गोटे गावात दिपाली विजय पाटील सरपंच पदी विजयी
मोरेवाडी गावात रणजीत तांदळे
बोंगेवाडीत सुरेखा विलास घेवारी सरपंचपदी विजयी
-तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या सुनिता सरदार पाटील सरपंचपदी विजयी.-वेतवडे ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीची सत्ता. सरपंचपदी रेखा पोवार विजयी
राधानगरी तालुका
राधानगरी तालुक्यात शिंदे गटान खात खोलल
राधानगरी तालुक्यातील हसणे गावच्या पुजा शरद पाटील सरपंचपदी विजयी.
आजरा तालुका
-आमदार हसन मुश्रीफ यांच्या विभागातील मडिलगे ( ता. आजरा ) सरपंचपदी बापू नेऊंगरे विजयी.
-नेंऊगरे गटाला सरपंचासह ५ जागा
आजरा तालुक्यातील सरबळवाडीत राष्ट्रवादीचा झेंडा
सरपंच उमेदवार सुनिता कांबळे विजयी.
संरबळवाडीत ता. आजरा सत्तातंर सरपंच पदासाठी सौ. सुनिता काबळे व समविचारी परिवर्तनचे 4 सदस्य विजयी.
-कानोली हारुरमध्ये राष्ट्रवादीला फटका. सुषमा सुभाष पाटील स्थानिक आघाडी विजयी. राष्ट्रवादीच्या सुप्रिया पाटील पराभूत.
-सुळेरान येथे भाजपचा झेंडा.
शशिकांत कांबळे विजयी
देवदास सूर्यवंशी राष्ट्रवादी पराभूत
कागल तालुका
कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये पहिल्या टप्प्यातील रणदिवेवाडी, बामणी, कसबा सांगाव व निढोरी या चार ग्रामपंचायतीवर भाजपने विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सरपंच पदाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत
भादवणवाडी- सत्तांतर
सरपंच- महादेव दिवेकर सह आघाडी ६ उमेदवार विजयी
भुदरगड तालुका
अरळगुंडी, वेंगळूर, देवकेवाडी, शेनगाव, न्हाव्याचीवाडीत
भाजपचाच झेंडा
हातकणंगले, रुकडी ग्रामपंचायत निवडणूक निकाल
खासदार धैर्यशील माने ( शिंदे गट शिवसेना )
रुकडी सरपंच पदाचे उमेदवार राजश्री रूकडीकर माने गट विजयी
खासदार धैर्यशील माने यांच्या गावात त्यांनी राखला गड
हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावात खासदार धैर्यशील माने यांच्या चुलत भावाचा पराभव
माजी उपसरपंच मोहन माने यांचा पराभव
रुकडी गावात सत्ता राखण्यात खासदार धैर्यशील माने यांना यश मात्र चुलत भावाचा पराभव
शिरोळ – ग्रामपंचायत निवडणुक निकाल
-शिरोळ तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व कायम
-17 पैकी 11 ठिकाणी शिंदे गटाची सत्ता
-राजेंद्र पाटील यड्रावकरांनी गड राखला
-भाजपला दोन, काँग्रेसला दोन , अपक्ष 2
अकिवाट मधून सरपंचपदी सौ. वंदना सुहास पाटील विजयी झाल्या. तर, खिद्रापूर मधून सरपंचपदी सौ. सारिका कुलदीप कदम विजय
-शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात. संभाजीपूर मधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे उमेदवार विजयी.
-कनवाड ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर. काँग्रेस, स्वाभिमानी, राष्ट्रवादी, शिवसेना, स्थानिक आघाडीच्या आघाडीचे इरफान बुरान सरपंच पदी विजयी.
कोल्हापूर, पाचगाव
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील गटानं गड राखला.
काँग्रेसच्या प्रियांका पाटील विजयी.
धनंजय महाडिक गटाचा सत्तांतराचा प्रयत्न अयशस्वी.
सीमेवरील शिनोळीत शिंदे गटाचा दारुण पराभव
चंदगड तालुक्यातील शिनोळीमध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव.
राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवून लावली.
एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव यांनी गावातील सत्तेला दिला हादरा
शिनोळी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता प्रचार.
शंभूराज देसाई निवडणुकीत प्रचार केल्याने सर्वांच्या नजरा या निवडणुक निकालाकडे लागल्या होत्या.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









