कोल्हापूर महानगर, ग्रामीण पूर्व आणि ग्रामीण पश्चिम या तीन विभागाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारिणी गुरूवारी जाहीर करण्यात आली. कोल्हापूर महानगर, कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर पश्चिम अशा तीन विभागातील पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या.
कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, हातकणंगले (पूर्व) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आणि कोल्हापूर (पश्चिम) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपापल्या विभागाच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केली होती. त्यावर चर्चा होऊन अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
भाजप कोल्हापूर महानगर कार्यकारिणी अशी :
सरचिटणीस : विजय सूर्यवंशी, संजय सावंत, डॉ सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत उपाध्यक्ष : अशोक देसाई, हेमंत आराध्ये, अजिंक्य चव्हाण, अजित ठाणेकर, आप्पा लाड, राजू मोरे, विराज चिखलीकर, उमा इंगळे, माधुरी नकाते, धनश्री तोडकर. चिटणीस : विजयसिंह खाडे-पाटील, भरत काळे, संतोष भिवटे, अतुल चव्हाण, रशीद बारगीर, रोहित पवार, जयराजसिंह निंबाळकर, स्मिता माने, संगीता खाडे, मंगला निपाणीकर, कोषाध्यक्षपदी राजसिंह शेळके. सात मंडल अध्यक्ष असे : कसबा बावडा मंडल : प्रदीप उलपे, शाहूपुरी मंडल : सुनीलसिंह चव्हाण, लक्ष्मीपुरी मंडल : विशाल शिराळकर, राजारामपुरी मंडल : अभिजित शिंदे, मंगळवार पेठ मंडल : सुधीर देसाई, शिवाजी पेठ मंडल : प्रकाश सरनाईक, उत्तरेश्वर पेठ मंडल :सतीश घरपणकर. महिला मोर्चा अध्यक्ष : रूपाराणी निकम, युवा मोर्चा अध्यक्ष : गिरीष साळोखे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : अनिल कामत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष : संतोष माळी, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष आजम जमादार.
भाजप ग्रामीण पूर्वची कार्यकारिणी अशी :
सरचिटणीस : विठ्ठल पाटील, शहाजी भोसले, अजिंक्य इंगवले, माधुरी कुरणे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष : विजय भोजे, मनोज हिंगमिरे, प्रवीण प्रभावळकर, सचिन शिपुगडे, मोहन वाईगडे, हरिश्चंद्र पाटील, वैशाली नायकवडी, मनीषा डांगे, विजया पाटील, संतोष पटवर्धन, चिटणीस : महावीर तकडे, राजेंद्र डाईगडे, नानासो जाधव, विजयकुमार रेडेकर, अविनाश चरणकर, सचिन मेथे, अश्विनी पाटील, सोनाली मगदूम, अनुराधा हिरवे, आनंदराव साने, कोषाध्यक्ष : अजितसिंह काटकर. तालुका अध्यक्ष असे : जयसिंगपूर : मिलिंद भिडे, हातकणगले : अमरसिंह पाटील, पन्हाळा : अमरसिंह भोसले, शाहूवाडी : पांडुरंग वर्गे, इचलकरंजी : पै. अमृतमामा भोसले, शिरोळ : मुकुंद गावडे. महिला मोर्चा अध्यक्षापदी पुष्पा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. अरविंद माने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अशोक माळी, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष तय्यब कुरेशी, किसान मोर्चा अध्यक्ष सुरेश बेनाडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संतोष वाठारकर यांची नियुक्ती झाली आहे.
भाजप ग्रामीण पूर्वची कार्यकारिणी अशी :
सरचिटणीस : नाथाजी पाटील, डॉ. आनंद गुरव, सुशीला पाटील, प्रमोद कांबळे. उपाध्यक्ष : संभाजी आरडे, सुधीर कुंभार, किरण घाटगे, हंबीरराव पाटील, राजेंद्र तारळे, संजय पाटील, मोहिनी पाटील, ज्योती पाटील, मेघाराणी जाधव, वसंतराव प्रभावळे, चिटणीस : संभाजी किल्लेदार, बबन देसाई, महादेव नाईक, अनिल देसाई, सुभाष जाधव, राजेंद्र ठाकुर, मिनाक्षी नकाते, क्रांती पाटील, शितल तिरुके, नामदेव कांबळे, कोषाध्यक्ष : बळवंत पाटील. तालुका अध्यक्ष : राधानगरी : विलास रणदिवे, आजरा : अनिरुद्ध केसरकर, पन्हाळा (पश्चिम) : मंदार परीतकर, कोल्हापूर दक्षिण : अनिल पांढरे, भुदरगड : अनिल तळकर, गडहिंगलज तालुका कागल विधानसभा : प्रीतम कापसे, गडहिंगलज तालुका चंदगड विधानसभा : संतोष तेली, करवीर तालुका : दत्तात्रय मेडशिंगे, चंदगड तालुका : शांताराम पाटील, कागल : उत्तम पाटील, गगनबावडा : स्वप्नील शिंदे. महिला मोर्चा अध्यक्षा : अनिता चौगले, युवा मोर्चा अध्यक्ष : धीरज करळकर, किसान मोर्चा अध्यक्ष : नामदेव पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष : बाळासो जाधव, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष : समीर चांद.
महानगर कार्यकारिणीत भाजप, ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांचा भरणा
आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने कोल्हापूर महानगरच्या कार्यकारिणीत बहुतांश माजी नगसेवकांना पक्षाचे काम करण्याची संधी दिली आहे. यामध्ये 2015 ते 2019 च्या सभागृहात भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर महाडिक गटाच्या ताराराणी आघाडीतून त्यावेळी निवडून आलेल्या नगरसेवकांनाही जबाबदारी दिली आहे.









