Kolhapur District sport news : कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेअंतर्गत 13 वर्षांखालील मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात चैतन्य तारेने आयुष कदमवर 21-7, 21-6 अशा गेमफरकाने विजय मिळवून शनिवारी अंतिम फेरी गाठली. आयुष पाटीलनेही शिवराम मोरेचा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. याचबरोबर 19 वर्षांखालील मुलांच्या गटातील दुहेरी प्रकारात झालेल्या उपांत्य सामन्यात चिन्मय ढवळशंख आणि हर्षवर्धन यांच्या जोडीने भूषण पाटील आणि दिलीप निकम यांच्या जोडीला 21-10, 21-10 अशा गेमफरकाने हरवत अंतिम फेरीत उडी घेतली. रितेश सांडूगडे आणि रुद्र साळोखे यांच्या जोडीने सुजल सोलापूरे आणि विराज थोरात यांच्या जोडीला नमवून अंतिम फेरी गाठली.
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात अंबाई डिफेन्स सोसायटीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये 33 उपांत्यपूर्व सामने खेळवले. यापैकी 13 वर्षांखालील मुलांच्या गटात चुरशीने खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व लढतीत शिवम मोरेने श्रेयस घरसेला 13-21, 21-12, 21-10 अशा गेमफरकाने पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. आयुष कदमनेही दमदार खेळी करत निल शिरोडकरवर 22-20, 21-16 अशा गेमफरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात अन्वी थोरातने एच. प्रगतीला 21-5, 21-7 तर श्रेया सूर्यवंशीने अंकिता मांगलेला 21-15, 21-17 अशा गेमफरकाने पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. याचबरोबर 17 वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये प्रांजल मानेने सिद्धार्थ खवटवर 21-16, 22-25, 21-8 अशा गेमफरकाने तर रुद्रा उमराणीया, अपूर्व दवदाते आणि चिन्मय ढवळशंख यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश उडी घेतली. मुलींच्या गटातील सामन्यात श्रीनिका हांजीने आसावरी चव्हाणला 13-21, 21-15, 21-16 अशा गेमफरकाने हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. विभा पाटील, गार्गी आंबेकर आणि राधिका काणे यांनीही प्रतिस्पर्धींना हरवून उपांत्य फेरी गाठली. 11 वर्षांखालील मुलांच्या गटातील सामन्यांमध्ये पुष्कर खोत, अर्णव दंबाळ, सुजन कुलकर्णी व शौर्य कदम यांनी तर 15 वर्षांखालील मुलांच्या गटात रणवीर चव्हाण, चैतन्य तारे, शिवम मोरे आणि आयुष पाटील यांनी दमदार खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच मुलींच्या गटात हार्दिका शिंदे, ऋतिका कांबळे यांनीही विरुद्ध खेळाडूंना हरवून उपांत्य फेरी गाठली. दरम्यान, स्पर्धेचा आज 28 रोजी अखेरचा दिवस आहे. दिवसभरात विविध वयोगटातील सर्व उपांत्य सामने व अंतिम सामने सासने मैदानावरील बॅडमिंटन हॉलमध्ये खेळवले जाणार आहेत.
Next Article पीककर्ज वसुलीत कोल्हापूर लयभारी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.