काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना कोल्हापूरवासीयांची गेली अनेक वर्षांची मागणी आहे. ही योजना सद्यस्थितीत पूर्णत्वास येत आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करणार असल्याची माहीती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याबाबत शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे महानगरपालिका महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सणसुदीच्या काळात कोल्हापूरच्या नागरिकांनाच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा शहरवासीयांच्या रोषास सामोरे जावे लागेल असा ईशारा पालिका अधिकाऱ्यांना दिला.
तसेच येत्या काळात थेट पाईपलाईनचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करणार असल्याची माहीती देताना क्षीरसागर म्हणाले, “काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना कोल्हापूरवासीयांची गेली अनेक वर्षांची मागणी आहे. ही योजना सद्यस्थितीत पूर्णत्वास येत आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करणार आहे. या योजनेचे उर्वरित काम काटेकोरपणे करण्यात यावे. योजना पुर्ण होताना त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नयेत जेणेकरून पुन्हा नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागू नये याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाकडून घेतली जाईल.” अशी माहीती देऊन राजेश क्षीरसागर यांनी थेट पाईपलाईनच्या कामाचा आढावा घेतला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उदय भोसले, निलेश हंकारे, सुरेश माने आदी उपस्थित होते.









