शेळोशी / सागर पाटील
धामणी परिसरामध्ये एकीकडे शेतीसाठी लागणाया पाण्याचे असणारे दुर्भिक्ष, मार्च-एप्रिलमध्येच कोरडे पडलेल धामणी नदीचे पात्र तर दुसरीकडे पाण्यासाठी खड्डे मारून जीवाचं रान करून पीक वाचविण्यासाठी शेतकयांची चाललेली तळमळ पण तळ हाताच्या फोडावाणी जपलेल पीक डोळ्यादेखत दिवसाढवळ्या गवारेडय़ाकडून फस्त होताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. मानवी जीवन उकाडय़ाने असाहाय्य झाल आहे .त्यात जंगलात टाकले जाणारे वनवे जीवसृष्टीला घातक आहे ठरत आहेत. त्यामुळे जंगलामध्ये वावरणारे जीव पाण्यासाठी ,चायासाठी मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागले आहेत.
वाढत्या उष्माघातामुळे गवे पाण्याच्या शोधार्थ रानोमाळ हिंडताना दिसत आहेत. डोंगरदयातील पाण्याचे झरे उन्हाळ्यात कोरडे पडतात, वन्यप्राण्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वन्य प्राणी झाडांचा आसरा घेतात. पण जीव साखळीतील मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात लागलेल्या वणव्यामुळे प्राण्यांचे आसरे नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे गव्यासारखा बलाढय़ प्राणी दिवस मावळताच कळपाने शिवारामध्ये घुसून पिक उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. एकीकडे काबाडकष्ट करून पाणी टंचाईत सुद्धा पिक वाचवायचं, तर दुसरीकडे जंगली प्राण्यांचा उपद्रव सोसायचा या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
वन्य प्राण्या पासून शेतीचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी शेतामध्ये मचान बांधतात. दिवसभर कष्ट करून सायंकाळी घरी परतोय तोच कळपानं गवे शेतात घुसतात. त्यांना हुसकावून लावण्यासाठी विजेरी, डबे, झटका मशीन यांचा वापर केला जातो. पण त्यालाही हूल देत गवे शिवारात वावरताना दिसू लागले आहेत. अनेकदा हे प्राणी जीव घेवा हल्ला करताना दिसत आहेत.
अन्नसाखळी मध्ये मोठ्य़ा प्रमाणात होत चाललेला मानवी हस्तक्षेप जैवविविधतेचा खहासास कारणीभूत ठरत असून वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. पर्यायांना शेतकरी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.









