कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडावर तानपीर मजाराची नासधूस करण्यात आली आहे. अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास नासधूस केल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळगडावरील श्रदस्थान असलेल्या मजारीची नासधूस केल्याने पन्हाळ्यावर बंदची हाक देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर किल्ले पन्हाळगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पन्हाळ्यावरील ही मजार शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचा उल्लेख आहे.
यावेळी घटनास्थळी हिंदू आणि मुस्लिम बांधवाचा एकोपा पाहण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदू-मुस्लिम समाज बांधावाकडून एका तासात डागडुजी करण्यात आली.गेल्या आठवड्याभरापासून या मजारीबाबत समाजमाध्यमावर गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप होत आहे.यामुळे पन्हाळ्यावर जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वातावरण निवळल्यानंतर प्रवेश मिळेल,कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









