पाचगाव, वार्ताहर
मोरेवाडी परिसरात डेंगूचा कहर सुरू असून अनेक नागरिक डेंगू बरोबरच सर्दी, ताप, खोकला या आजाराने त्रस्त आहेत. असे असताना ग्रामपंचायतीचे गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. निर्मल ग्राम पुरस्कार मिळवलेल्या मोरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गटार तुंबलेल्या आहेत. मात्र त्याच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.ग्रामपंचायतीने गावात साफसफाई करावी. डास निर्मूलनासाठी धूर फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
केदार नगर परिसरासह अनेक भागातील नागरिक डेंगू आजारामुळे त्रस्त झाले आहेत. मोरेवाडी परिसरात उपनगरांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र या उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी गटारांची सुविधा नसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुंबलेल्या गटार व अनेक ठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने गावात साफसफाई करावी, डास निर्मूलनासाठी धूर फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









