कोल्हापूर प्रतिनिधी
मान्सून 2022 आणि संभाव्य पूर स्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर मार्फत राजाराम तलाव येथे पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची चाचणी आणि प्रात्यक्षिके तसेच स्वयंसेवकांचे प्रशिक्षण राजाराम तलाव येथे आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सोबत काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवकांना सोबत घेऊन जिल्हास्तरावर ती उपलब्ध असणाऱ्या रबर मोटर बोटी लाइफ जॅकेट लाइफ रिंग दूर गोटीचे मशीन इत्यादी सर्व साहित्याची चाचणी, स्वच्छता तपासणे, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन पथकातील स्वयंसेवकांसाठी पूर व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आज राजाराम तलाव कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना संबोधित केले.
कोल्हापूर जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापनाचे कौतूकही त्यांनी केले. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत जिल्ह्यातील युवक-युवती आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये अगदी हिरीरीने सहभाग घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनी दिवसभराच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची गरज कोल्हापूर जिल्ह्याची पूर प्रमाण का आणि पूर व्यवस्थापनासाठी करावयाचे कार्य याविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, सिद्धार्थ पाटील, दीपक शिंदे, शुभांगी गराडे, इत्यादी प्रशिक्षकांनी बोट चालवणे, पूर व्यवस्थापन करणे, पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, इत्यादी बाबतचे प्रात्यक्षिक आतून प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना दिले.









