राज्यातल्या नव्या मंत्री मंडळात मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटीची ऑफर देणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. मंत्रिपदाच्या लोभात एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने देखील १०० कोटी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र वेळीच सावधान होत याच आमदाराच्या मदतीने पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मास्टरमाईंड कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली (Shiroli) येथे राहणारा रियाज अल्लाबक्ष शेख (Riyaz Shaikh)असल्याचे समोर आले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने त्याने हा पराक्रम केला असल्याचे उघड झाले.
राज्यातील सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना त्याचाच फायदा घेत मंत्रिपद मिळवून देतो, असे सांगून १०० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या रियाज शेखला मुंबई (Mumbai) खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ओबेराय हॉटेलमधुन आमदार राहुल कुल आणि आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासमोर हि कारवाई केली.
आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटीची ऑफर देण्यात आली होती. याची फायनल रक्कम ९० कोटी ठरली होती. त्यानुसार रियाजला पैसे घेण्यासाठी मुंबईच्या ओबेराय हॉटेल (Oberoi Hotel) येथे बोलावले. ठरलेल्या रक्कमेवर २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये काम होण्याआधी द्यावे. लागतील, अशी अट रियाझने ठेवली. कुल यांनी ती मान्य करून दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावले. एका बाजूला पैसे देण्याची तयारी. दाखवत दुसऱ्या बाजूला त्यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी सापळा रचून रियाझसह योगेश कुलकर्णी (ठाणे), सागर संगवई (ठाणे) आणि जाफर उस्मानी (नागपाडा मुंबई) यांना बेड्या ठोकल्या.
हेही वाचा- लोकसभेला मी इच्छुक नाही,पुन्हा एकदा आमदार होण्याची इच्छा; हसन मुश्रीफ
मास्टरमाईंड रियाज शेख कोल्हापूरचा
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली (ता. हातकणंगले) येथील रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, रा. शिरोली, जि. कोल्हापूर) आहे. रियाज हा जिल्हा परिषदेच्याजवळ अलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो. रियाज १९९६ नंतर शिरोली येथील एका व्हिडिओ सेंटरमध्ये कामाला लागला, त्यानंतर गावातच केबल ऑपरेटिंगची कामे करू लागला. पण त्याला कमी वेळेत श्रीमंत व्हायचे होते. यातच तो कोल्हापुरातील एका मायनिंग उद्योजकाकडे कामाला लागला. काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःची मायनिंग सुरू केली.शाहूवाडी व गोवा येथे मायनिंगमध्ये पैसे मिळवले. आलिशान गाड्या घेतल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








