2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते सुध्दा यामध्ये सहभागी झाले
कोल्हापूर : आजचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. 45 वर्षापूर्वी येथील वकील, नागरिकांनी सर्किट बेंचचे स्वप्न पाहिले त्या स्वप्नामध्ये पंधरा वर्षापूर्वी सहभागी झालो. 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते सुध्दा यामध्ये सहभागी झाले. त्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे.
24 मे 2019 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली आणि न्यानंतर देशभर आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात फिरलो. 2022 मध्ये सिंधुदुर्गला संग्राम देसाईच्या मागणीला पाठिंबा दिला. अॅड. विवेक घाटगे कोल्हापूरच्या कार्यक्रमाचा आग्रह करायचे.
अॅड विवेक घाटगे यांचे भाषण ऐकून काय ती झाडी काय ते डोंगर, काय ते हॉटेल सगळंच एकदम बेस या भाषणाची आठवण आली. कोल्हापूरला 2025 मध्ये आणि कोणत्या कार्यक्रमाला यायचे हे ठरवले होते. म्हणून त्यापूर्वी कोल्हापूरला आलो नाही. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे या परिसरातील.
यामुळे या महापुरुषांच्या विचारांचा पगडा लहानपणापासून मनावर कोरला आहे. अस्पृश्यतेच्या विरुध्द, विषमतेच्या विरुध्द शाहू महाराजांनी लढा दिला. अवघ्या 20 वर्षाचे असताना राजर्षी शाहूंचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी त्यांच्या जाहीरनाम्यातील वाक्याने प्रेरित होऊन ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला.
आपल्याला मिळालेला अधिकार, राजवैभव, राजविलास हे उपभोग घेण्यासाठी नसून रंजल्या, गांजलेल्या प्रजाननांच्या उध्दारासाठी आहे हे शाहूंनी पहिल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. त्याच विचाराला अनुसरुन प्रत्येक पदावरुन काम केले. पद हे नियतीने देश, समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे. त्यानुसार मार्गक्रमण करत आहेत.
राजर्षी शाहूंनी मिळालेल्या आयुष्यात मोठे काम केले. यामुळे ते अजरामर झाले आहेत. मागासवर्गीयासाठी आरक्षण लागू केले, दलितांना मोफत शिक्षण दिले, वसतीगृहे सुरु केली. गंगाराम कांबळे यांना हॉटेल सुरु करुन देऊन त्या हॉटेलमध्ये स्वत:चहा पित. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली, देवदासी प्रथा बंद केली. यामुळे त्यांची जयंती 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत राजर्षी शाहूंचे मोलाचे योगदान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे योगदान आहे. बाबासाहेबांना लंडन स्कुल इकॉनामिक्समध्ये पीएचडी करण्याकरता आर्थिक अडचणींमधून जावे लागले. त्यावेळी ते लंडनमधून शिक्षण सोडून आले. त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन लंडनला पाठवले.
त्यानंतर बाबासाहेबांनी त्यांचा जगप्रसिध्द असा ‘प्राब्लेम ऑफ रुपी“ हा ग्रंथ लिहला, याच ग्रंथावर आपली अर्थव्यवस्था आज आधारित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते त्या घराचे स्मारकात ऊंपातर केले आहे.
मला आनंद आहे की मी त्या स्मारकाला भेट देऊन आलो. आणि या स्मारकात बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी स्कॉलरशिप दिलेला दस्ताऐवज सहीसह उपलब्ध आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक या वर्तमानपत्राला त्या काळात तीन हजार ऊपयांची मदत शाहू महाराजांनी केली होती.
दलित, शोषितांचा आवाज सर्वदुर पोहोचू शकेल. त्याचबरोबर शाहू महाराजांनी माणगाव येथे परिषद आयोजित केली होती. त्यावेळी उपस्थितांना संबोधून शाहू महाराज म्हणाले होते की तुम्ही तुमचा पुढारी तुम्ही शोधला आहात याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्वार केल्याशिवाय राहणार नाहीत.
एवढेच नव्हे तर एक दिवस असा येईल की ते संपूर्ण हिंदुस्थानाचे पुढारी होतील. यावरुन राजर्षी शाहू किती द्रष्टे होते हे कळते. त्यांनी बाबासाहेबांचे गुण ओळखून त्यांच्याबद्दल केलेले भाकित खरे ठरले. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण दैवत मानतो. त्यांच्या विचारावर कार्य करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
शाहू महाराजांचे वंशज खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते विमानतळावर माझे स्वागत झाले. यापेक्षा मोठी अभिमानाची बाब माझ्यासाठी काय आहे. कार्यक्रमाचे वेगळे नियोजन होते. रत्नागिरी तालुक्यातील मंडणगड तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुळ गाव आहे.
त्या ठिकाणी कोर्ट ऊमचे उद्घाटन करायचे आणि त्यानंतर कोल्हापूरात सर्किट बेंचच्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असे नियोजन होते. मात्र मंत्री उदय सामंत यांनी त्याठिकाणी पाऊस जोरदार असल्याचे सांगितले. आपण व्हिएतनामला जाणार होतो. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यातील कोर्ट रुमचे उद्घाटन करणे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
ज्या शाहू महाराजांच्या सर्किंट बेंच उद्घाटन करत आहोत लवकरच त्याचे खंडपीठामध्ये ऊपांतर होणार आहे. याचा मला आनंद आहे. सर्किट बेंच होण्यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांचा नामउल्लेख राहिला असेल त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करुया.
शनिवारी विमानतळावरुन येत असताना रस्त्याच्या बाजूला लावलेल्या फलकावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकरांचा तसेच आपला आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांचा देखील फोटो होता अशी मिश्किल टिपण्णी सरन्यायाधीश गवई यांनी केली.
सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांचा 2014 पासून सहभाग राहिला आहे. 45 वर्षापासून या भागातील जनता, वकिलांनी अखंड असा संघर्ष केला. या संघर्षातील अनेक वकील आज हयात नाहीत. माजी न्यायमूर्ती मोहीत शह यांनी सर्किट बेंचसाठी नेमलेल्या समितीमध्ये रणजीत मोरे आणि अन्य एका न्यायाधीशांचा समावेश होता.
रणजित मोरे यांनी सकारात्मक अहवाल दिला तर त्या न्यायाधीशांनी असहमती दर्शवली. मोरे यांनी कोल्हापूरला खंडपीठ झाले पाहिजे अशी भूमिका मांडली. त्यामुळे न्यायमूर्ती मोहीत शहा हे खंडपीठाची घोषणा करतील अशी खात्री होती. पण त्यांनी निवृत्तीच्या भाषणात काही कारणामुळे सर्किट बेंच जाहीर करता येत नसल्याचे स्पष्ट केले.
2025 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर संग्राम देसाई यांनी सर्किट बेंचची आठवण करुन दिली. यामुळे न्याय पक्षकारांच्या दारात जाण्यासाठी प्रयत्न केला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांना कोल्हापुरातील सर्किट बेंचचे काम करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर समिती स्थापन केली.
समितीने सकारात्मक अहवाल दिला आणि चालना मिळाली. 28 जून रोजी न्यायमूर्ती आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात नागपूरमध्ये असताना बैठक झाली. फडणवीस यांनी पाठिंबा दिला आणि 17 ऑगस्ट रोजी उदघाटनाची तारीख ठरवली.
सर्किट बेंचसाठी इमारतीचा प्रश्न होता. त्यावेळी संग्राम देसाई यांनी जुन्या इमारतीचा पर्याय सुचवला. याच इमारतीतून शाहू महाराजांच्या कालावधीत न्यायदानाचे काम झाले होते. त्यानंतर इमारत पाहून अहवाल दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाने एका महिन्यात निविदा काढण्यापासून पायाभूत सुविधा उभारण्याचे काम केले.
अशक्य ते शक्य करण्यात आले. 25 दिवसात पूर्ण इमारतीचे रुप बदलून सुंदर इमारत तयार केली. महाराष्ट्र ज्युडिशियल पायाभूत सुविधा देण्यात मागे नाही हे या कार्यातून दाखवून दिले आहे. खासदार शाहू महाराज यांनी दिल्लीत भेट घेतली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोल्हापूरात येऊन गेले आहेत ते कशासाठी आले होते असे विचारले होते पण त्यांना माहित नसल्याचे सांगितले.
राज्यपालांना 1 ऑगस्ट रोजी सर्किट बेंचची नोटीफिकेशन काढण्यास सांगितले. त्यादिवशी दिल्लीवरुन नागपूरला जात असताना माजी खासदार संभाजीराजे यांची विमानात भेट झाली आणि त्यावेळी संभाजीराजे यांना पहिल्यांदा अधिकृतरित्या कोल्हापूरात सर्किट बेंचचे नोटीफिकेशन निघाल्याची माहिती दिली.
त्यांनी विमानातच फोटो काढला आणि विमानातून उतरल्यावर त्यांचे व्टिट दाखवले. मकरंद कर्णिक आणि विलास गायकवाड यांचे यामध्ये मोलाचे योगदान राहिले आहे. हेमंत भोसले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतुल चव्हाण, आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांचेही योगदान आहे.
देशाच्या राज्यघटनेत सरनाम्यात न्याय आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण विरोधाभासात जात असल्याचे बाबासाहेब म्हणाले होते. सामाजिक विभागात चार, आर्थिक विभागात विभागलो गेलो आहोत. कोल्हापुरात खंडपीठ होणे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक न्यायदानातील मैलाचा दगड आहे.
कमी वेळेत या बेंचमधून न्याय मिळेल अशी खात्री आहे. वकीलासाठीही मोठी संधी निर्माण करुन दिली आहे. मुंबईत प्रॅक्टीस करणारे 200 वकील कोल्हापूरात येतील. याच न्यायालयातून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे, बारामती–कोल्हापूर एक्सप्रेस व्हावा
कोल्हापूर ते पुणे, बारामती एक्सप्रेस बांधा. पुणे कोल्हापूर सर्किट बेंचशी जोडले जाईल. पुण्याची वकिली करणार नाही. वकिलांचा नाही तर नागरिकांचा विचार करायचा असतो. खंडपीठाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशा आशावाद सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरकरांचा आशीर्वाद मिळेल
सरन्यायाधीश गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांना उद्देशून म्हणाले, अंबाबाई, शाहू महाराज, कोल्हापूरकरांचा आशीर्वाद मिळेल. तीन महिन्यात 50 अपॉईटमेंट करण्याची संधी मिळाली. आराध्ये यांनी सर्किट बेंचचे कायमस्वरुपी बेंच होण्याचा प्रस्ताव करावा. माझ्याकडे सव्वा तीन महिन्यांचा कालखंड आहे.
त्यांच्या विचारांना प्रमाण मानून न्यायदानाचे काम
शाहू महाराजांनी ज्या इमारतीत न्यायदानाचे काम केले त्या इमारतीत आमच्या भगिनी शर्मिला देशमुख, मकरंद कर्णिक, शिवकुंमार दिघे यांना सेवा करण्याची संधी मिळते आहे. शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून ते या इमारतीतून न्यायदानाचे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील शेवटच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. मुंबईला न्यायासाठी फेऱ्या माराव्या लागतात त्यांच्यासाठी सर्किट बेंच मंजूर केले. बेंच करताना सीमाभागातील नागरिकांचा विचार केला आहे.
शाहू महाराज यांच्यावरील कविता सादर
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शाहू महाराज यांच्यावरील कविता सादर केली. शाहू महाराजांचा वारसा सांगणे म्हणजे समतेचा कैवार घेणे, संधीची समानता मानणे, लोकशाहीचे आढळत्व, माणूस म्हणून सन्मानाने जगू देणे, शाहू महाराजांचा वारसा सांगणे म्हणजे शिक्षणाची सक्ती, देवदासी प्रथाबंदी कायदा, घरगुती हिंसाचार मनाई असे कायदे शतकापूर्वी कठोरतेने अंमलात आणणे, कला क्रीडेला प्रोत्साहन, राधानगरी धरणाचे निर्माण, जनतेचा लोकराजा होणं.








