गिरीश मलिये चषक क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित तिसऱया गिरीश मलिये चषक 19 वर्षाखालील बाद पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर चॅलेंजर संघाने चॅम्पियन नेट संघाचा 85 धावानी तर दुसऱया सामन्यात कोल्हापूर संघाने एसकेईचा 1 गडय़ाने विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला. सुमित कदम, वरद खोडवी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या टर्फ विकेट मैदानावर प्रमुख पाहुणे धनंजय नाईक, विक्रम देसाई व आनंद करडी आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ईश्वर इटगी, महांतेश आदी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात कोल्हापूर चॅलेंजर संघाने 39.3 षटकात सर्व बाद 229 धावा केल्या. सुमित कदमने नाबाद 66, नितेश केतानीने 43, पियूष गायकवाडने 35 धावा केल्या. चॅम्पियन नेट संघातर्फे गजानन व मदन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅम्पियन नेट संघाचा डाव 34.2 षटकात सर्व बाद 145 धावात आटोपला. मदनने 39, नागार्जुनने 25 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे वरद खोडवी व मरिन शेख यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सोमवारी झालेल्या सामन्यात एसकेई बेळगाव संघाने 37 षटकात सर्व बाद 193 धावा केल्या. शुभमने 35, मंथनने 31, अशोकने 23 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे रूद्राने 3, रचित व वरद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोल्हापूर चॅलेंजर संघाने 33.5 षटकात 9 बाद 194 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. वरद खोडवीने 37, सुमित कदमने 32, नितेश केतानीने 31 धावा केल्या. एसकेईतर्फे मंथन व दिनेश यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.









