कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरात सीबीआयकडून लाच घेताना जीएसटी विभागाच्या अधिक्षकासहित एका निरीक्षकाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. 50 हजारांच्या लाच प्रकरणात अटक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये सीबीआयने लावला सापळा होता. जीएसटी विभागाचे अधीक्षक महेश नेसरीकर यांच्यासहित निरीक्षक अमित मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (सीबीआय )यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मध्यावरठी जीएसटी कार्यालयात कारवाई केली . यात एक अधीक्षक आणि एका निरीक्षकाला ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. एका तक्रारीवरून या अधीक्षकांवर आणि निरीक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २०१७-२०१८ ते २०२०सेवा कर दायीत्वाबद्दल प्रकरण निकाल काढला तक्रारदाराकडून ७५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर हि रक्कम ५० हजार इतकी झाली. याची तक्रार दिल्यानंतर सीबीआयने याबाबत सापाळा लावला. त्यात लाच स्वीकारताना हे दोन्ही अधिकारी रंगेहाथ सापडले. जयसिंगपूर आणि कोल्हापूर येथे दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना आज विशेष न्यायाधीश, जयसिंगपूर, जिल्हा-कोल्हापूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
.