सरुड वार्ताहर
सावे तालुका शाहूवाडी येथील मेंढरांच्या तळावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल अकरा बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे .एकाच वेळी बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या बकऱ्यावर हल्ल्यामुळे सावेसह पंचक्रोशी मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .या हल्ल्यामध्ये सुमारे 50 हजार हून अधिक रुपयांचे आर्थिक झाल्याचे माहिती मेंढपाळांच्याकडून कळाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सावे गावच्या पूर्व दिशेला ज्ञानदेव पाटील यांच्या रानात मेंढरांचा कळप बसवला आहे . यामध्ये ईश्वरा वग्रे ( सोनवडे ) ,सुनील नलवडे यांच्यासह तीन मेंढपाळांची .बकरी आहेत . दुपारच्या वेळेमध्ये मेंढपाळ आपली बकरी फिरवण्यासाठी घेऊन गेले असता बकऱ्यांच्या तळावरती बिबट्याने अचानक हल्ला करून आठ बकऱ्यांचा जागेवरच फडशा पाडला आहे . तर तीन बकरी अद्यापही गायब आहेत . एकाच वेळी हल्ला करून 11 बकरी मृत्यूमुखी पडल्याची शाहूवाडी तालुक्यातील पहिलीच घटना आहे .आदल्याच दिवशी शिरगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला होता .सायंकाळच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळांच्या सह नागरिकांच्या भितीचे वातावरण आहे .शाहुवाडी तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून वन विभागाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे .दरम्यानच्या काळात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे .बिबट्यांच्या वाढत चाललेल्या हल्ल्यामुळे सावे पाटणे सह शिरगाव , भैरेवाडी परिसरामधील नागरिकांच्या मधून भीतीचे वातावरण पसरले आहे









