वाहन चालक व गट ड वगळून 18 संवर्गातील पदांची भरती; आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया
कृष्णात चौगले कोल्हापूर
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेत 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 18 संवर्गातील तब्बल 633 पदांची सरळसेवा पद्धतीने भरती होणार आहे. गट – क मधील आरोग्य व इतर विभागतील संवर्गाच्या पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम 21 ऑक्टोंबर 2023 व 15 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार गट क मधील सर्व संवर्गाची ( वाहन चालक व गट – ड संवर्गातील पदे वगळून ) 633 रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी दिली. या पदसंख्येमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे.
या भरतीच्या पार्श्वभूमीवर सर्व संवर्गाची बिंदु नामावली नोंदवही विभागीय मागसवर्गीय कक्ष पुणे यांच्याकडून अंतिम तपासणी करुन घेण्यात आलेल्या आहेत. सदरची पदभरती परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत 25 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयाने कळविले आहे . यासाठी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यासाठी विभागीय स्तरावरुन घ्ँझ्ए ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) या कंपनीची निवड केलेली आहे
पदभरतीसाठी कंपनी व जिल्हा परिषद यांच्यामध्ये सामंजस्य करार केला जाणार असून त्याचे प्रारूप शासनाच्या सुचनेनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून मंजुर करुन कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. परिक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार असल्याने त्याचे Aज्ज्त्ग्म्atग्दह झ्दूत् विकसित करण्याचे काम घ्ँझ्ए कंपनी स्तरावर सुरु आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत एकुण 18 संवर्गाचे 633 पदे परीक्षाद्वारे भरण्यात येणार असून याबाबत सामाजिक व समांतर आरक्षण निश्चित करुन भरतीबाबतची पदसंख्या निश्चित केलेली असून विभागीय स्तरावरुन जाहिरात प्रारूप अंतिम करण्याची कार्यवाही सुरु आहे. जाहिरात प्रारूप अंतिम झाल्यानंतर पदभरतीबाबत शासन स्तरावरून सुधारित कालबध्द कार्यक्रम निर्गमित झाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल व त्याअनुषंगाने शासन स्तरावरुन वेळोवेळी सुचना निर्गमित होतील. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे . सदरच्या पदभरती संदर्भात आगामी काळात होणाऱ्या कामकाजाबाबतची माहिती घेण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक योगेश सुर्यकांत जगताप (मोबाईल क्रमांक 8485868251) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
या पदांची होणार भरती
विस्तार अधिकारी (सांख्यिकी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, आरोग्य सेवक (पुरुष -40 टक्के), आरोग्य सेवक (पुरुष- 50 टक्के , हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (महिला), विस्तार अधिकारी (कृषी), पशुधन पर्यवेक्षक , कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ आरेखक (बांधकाम), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ यांत्रिकी, आंगणवाडी पर्यवेक्षिका (सरळसेवा) या पदांची भरती होणार आहे. या सर्व पदांसाठी संगणक अर्हता व लहान कुटूंबांबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.