Kolhapur Breaking Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज पासुन शहरातील सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोल्हापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, काल कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीमुळे करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील 27 गावांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना काल उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी सुट्टी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. करवीर तालुक्यातील 6 हातकणंगलेमधील 3 आणि शिरोळमधील 28 शाळांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात सहा दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला झोडपून काढले आहे. यामुळे धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.








