कोल्हापूर- गोव्याच्या दिशेने जाणारा शीतपेयांचा कंटेनर आज मध्यरात्रीच्या सुमारास पोळी खाडीच्या घाटात उलटला. ही घटना करवीर तालुक्यातील पिराचीवाडी परिसरात घडली. दरम्यान आज सकाळी शेतकऱ्यांच्या बाटल्या नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून देण्यात आली. मात्र येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी शीतपेयांच्या पडलेल्या बाटल्या पाहिल्यानंतर त्या लुटायला गर्दी केल. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरतात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Previous Articleकर्नाटक, बंगाल, मध्यप्रदेश उपांत्य फेरीत
Next Article भाजपने विदर्भात गमावलं, शिवसेनेने काय कमावलं?









