कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऐतिहासिक खासबाग मैदान आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. या अग्नी तांडवांमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या आगीने खासबाग मैदानालाही लपेटले आहे.
प्राथमिक माहितीनुसार जनरेटच्या स्फोटाने झालेली आग प्रथम केशवराव भोसले नाट्यगृहात लागली असून त्याचा वनवाक मैदानापर्यंत पोहोचला या वनव्यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबरच खासबाग मैदान हे जळून खाक झाले आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या यंत्रणा तातडीने बचाव कार्य राबवत आहे. अनेक सामाजिक संस्था आणि मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यासाठी हातभार लावला








