पुलाची शिरोली / प्रतिनिधी
कोल्हापूरात आज धक्कादायक घटना समोर आली असून करवीर तालुक्यातील शिये गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला आहे. तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेतवडीत आढळला असून या घटनेमुळे कोल्हापरात एकच खळबळ माजली आहे.
करवीर तालुक्यातील शिये गावामधील रामनगर येथे परप्रांतीय कुटुंब राहत आहेत. बुधवारी सायंकाळ पासून त्यांची मुलगी गायब होती. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. बुधवारी रात्रीपासून तिचा शोध सुरू होता. आज गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तिचा मृतदेह रामनगर शेजारील एका हॉटेलच्या शेजारी शेतवाडीमध्ये आढळून आला.








