कोल्हापूर प्रतिनिधी
आपल्या नृत्यामुळे महाराष्ट्रभर लावणीच्या माध्यमातून धुमाकुळ घालणाऱ्या गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमांना कोल्हापूरात मात्र बंदी घातली आहे. या संबंधीची माहीती कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
ते आज माध्यमांबरोबर कोल्हापूरात बोलत होते. ते म्हणाले, “गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन विविध ठिकाणी करण्यात आलं होतं. विशेषता करवीर आणि राधानगरी तालुक्यातील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. पण आता या कार्यक्रमांना कोल्हापूर जिल्ह्यात पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ” 22 आणि 24 सप्टेंबरला गिरगाव आणि राशिवडे येथे कार्यक्रमाचे आयोजन होते. गणेश उत्सवात पोलीस प्रशासनावर ताण पडला असून या कार्यक्रमासाठी बंदोबस्ताची व्यवस्था करता येणार नाही. या कार्यक्रमामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच ही परवानगी परवानगी नाकारण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात अशा कार्यक्रमाचे आयोजित करु नये” असे आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत यांनी केले.