ऑनलाईन टिम मुंबई
विधानपरिषदेसाठी येत्या 20 तारखेला 10 जागांसाठी मतदान होत असून यामुळे राज्याचे राजकिय वातावरण तापले आहे. भाजपने या निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून भाजपची विधान परिषदेसाठीची यादी जाहीर झाली. या यादीमध्ये प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी दिली आहे.
सगऴ्या राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबाबत मात्र पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या पदरी निराशाच पडली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी बोलताना खुलासा केला की, पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न केले होते. शेवटपर्यंत चित्रा वाघ यांच नाव शर्यतीत होते पण त्यांनाही यादीतून वगळण्यात आले. आपली विधानपरिषदेची टर्म संपवुन दुसऱ्यांदा जाण्यासाठी ईच्छूक असणारे सदाभाऊ खोत यांना दुसऱ्यांदा संधी नाकारण्यात आली.
भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते असलेले प्रविण दरेकर यांना उमेदवारी मिळणे जवळजवळ निश्चित होते. विधानपरिषदेमध्ये भाजपचा एक महत्वाचा चेहरा म्हणून त्यांना ओलखले जाते.
प्रसाद लाड यांना पहिली टर्म संपवून दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्यास मार्ग सुखकर झाला आहे. विधानपरिषदेतील एक भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात.
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात काम केलेले राम शिंदे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. कर्जत-जामखेड येथून निवडणूक लढवताना त्यांना रोहीत पवारांकडून पराभव स्विकारावा लागला होता.
काही काळ भाजपचे संघटन मंत्री असलेले राज्य सरचटणिस श्रीकांत भारतीय यांना भाजपने संधी देऊन सक्रीय राजकारणात आणले आहे. ते काही काळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD)होते.
भाजपच्या महीला आघाडीच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळकल्या जाणऱ्या उमा खापरे यांनी भाजपच्या महीला मोर्चा पदासह अनेक पदावर काम केले आहे. मागील काही दिवसात दिपाली सय्यदवरील टिकेमुळे त्या चर्चेत होत्या.













