कोल्हापूर : प्रतिनिधी
पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज पाहता नदीकाठच्या गावांनी स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहावे. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होऊ नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. दिलेल्या सूचना वेळोवेळी पाळत रहा. असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिलेल्या आहेत.
अधिक पहा Video- स्थलांतरासाठी तयार रहा…. जिल्हाधिकारी राहुल रेखावर
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी स्थलांतरासाठी तयार राहावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी करत कोल्हापूर आणि परिसरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचे सांगितले. पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत असून पावसाचा जोर वाढल्यास बिकट पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल. या पार्श्वभूमीवर रेखावार यांनी हे आवाहन केले आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीत पाण्याची आवक वाढल्याने अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या धरणातून एक लाख टिएमसीचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देखील रेखावार यांनी दिली आहे. स्थलांतराच्या आवाहनानंतर लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील जिल्हाधिकारी रेखावार यांनी म्हटले आहे.









