आठ दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये विकी आप्पासो सनदे व श्रीकांत तानाजी मोहिते हे दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सांगली फाटा येथील हॉटेल प्रसाद च्या शेजारी घडली. यामध्ये अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आठ दिवसापूर्वी विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी व अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी यांचा विकी आप्पासो सनदे व श्रीकांत तानाजी मोहिते यांच्यात स्क्रॅपच्या व्यवसायातून वाद झाला होता. या वादाचा राग विनायक व अनिकेत लाड यांच्या मनामध्ये होता .शनिवारी सायंकाळी सनदे व मोहिते हे दोघे हॉटेल प्रसाद येथे पार्किंगच्या मोकळ्या जागेत थांबले होते यादरम्यान विनायक व अनिकेत लाड यांनी अन्य मित्रांच्या साह्याने विकी सनदे याच्या डोक्यात व श्रीकांत मोहिते यांच्या मानेवर एडका व लाँनचाक या हत्याराने मारहाण करून जखमी केले. तसेच अन्य ९ जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाणव शिवीगाळ केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद विकी सनदे याने शिरोली पोलीस ठाण्यात दिली आहे.
यामध्ये अनिकेत सुकुमार लाड विनायक सुकुमार लाड, श्रीकांत कोळी, शुभम यादव ,आशिष वाडकर ,राहुल आयवळे, आदिनाथ यादव ,मनीष कुरणे, रुपेश कांबळे, अजय कांबळे आदी अकरा जणांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि पंकज गिरी हे करीत आहे.









