लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
लक्षतीर्थ वसाहत येथे वाढदिवसाचे पोस्टर फाडल्याच्या कारणातून दोघांवर प्राणघातक हल्ल्या करण्यात आला होता. या प्रकरणी पसार असणाऱया संशयित विजय ऊर्फ रिंकू देसाई (वय 40 रा. बोंद्रेनगर) याच्यासह त्याच्या साथीदार नितेश तानाची वरेकर (वय 26 रा. शिंगणापूर) लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी पहाटे चिकोडी ( जि. बेळगांव) येथून या दोघांना अटक केली.
लक्षतीर्थ वसाहत येथे वाढदिवसाचे पोस्टर लावण्याच्या कारणावरून ल्16 मे रोजी रात्री दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात संशयित विजय ऊर्फ रिंकू देसाईसह साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी यापुर्वी 14 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयीत रिंकू देसाई व त्याचा साथीदार नितेश वरेकर हा घटनेपासून पसार होता. शुक्रवारी त्याने अटकपुर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपुर्व जामिन अर्ज सादर केला होता. दरम्यान न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. यामुळे रिंकु देसाईच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या रिंकु व नितेश या दोघांना चिकोडी येथून ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









