kolhapur : तब्बल दोन वर्षांनी कोणत्याही निर्बंधाविना शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या नियोजना अभावामुळे त्याचा फटका पर्यटक आणि भाविकांना बसतोय.अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पायाला बोचणाऱ्या खडीतून, धुळीतुन वाट काढत दर्शनाला जावं लागत आहे. तसेच येणाऱ्या महिला भाविकांना लघुशंकेसाठी शौचालय शोधण्याची वेळ आली आहे.
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये पहिल्याच माळेपासून भाविकांची दर्शनासाठी विक्रमी गर्दी होत आहे. पहिल्या दिवशी ८५ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या माळेला दीड लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले होते. यामध्ये महिला भाविका शेकडो किमी प्रवास करून दर्शनासाठी अनवाणी पायाने येत आहेत. मात्र, यांना मुलभूत सुविधा देण्यात कोल्हापूर जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हजारो महिला पायपीठ करून दर्शनासाठी येत असताना त्यांना मंदिर परिसरात शौचालय नसल्याने त्यांची चांगलीच कुचंबणा होत आहे. त्याबाबत महिलांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे थेट तक्रार केली होती. मात्र तरी देखील त्यावर उपाययोजना झालेल्या नाहीत. मात्र पर्यटन वाढीसाठी गप्पा मारणारा जिल्हा प्रशासन ही सुविधा लवकर उपलब्ध करणार का असा सवाल देखील स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मंदिर परिसरातील बारीक खडीचा भाविकांना त्रास
कोल्हापूर शहरामध्ये पायाभूत सुविधांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. संपूर्ण शहरातील रस्ते कमी आणि त्यामधील गुडघाभर खड्डेच अधिक अशी विदारक अवस्था आहे. नवरात्रोत्सवामध्ये मंदिराकडे येणाऱ्या मार्गांवर खडी पसरण्याचा पराक्रम जिल्हा प्रशासनाकडून केला आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हामध्ये उपास असतानाही अनवाणी पायाने येणाऱ्या भाविकांना हे घाव सोसतच मंदिरात यावे लागत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









