राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळी पासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे सर्व रात्री उशिरा 10 वाजून 40 मिनिटाने बंद झाले आहेत, त्यामुळे धरणातून खाजगी जल विद्युत केंद्रातून 1600 क्यूसेकने विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.
रविवारी सकाळी पाणी पातळी 347.07 इतकी आहे, पाणीसाठा 8378.29 द. ल. घन फूट (8-28 टीएमसी) इतका आहे, तर गेल्या 24 तासात 62 मिमी पाऊस नोंदला असून आजतागायत 3381 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या भोगावती नदीची पाणी पातळी स्थिर आहे.
हे ही वाचा : कोयना धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा









