कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरातील आजरा तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलीचं प्रेम संबंध असलेल्या युवकाशी लग्न होणे यासाठी जादूटोणा व अघोरी प्रकार अवलंबल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल पोवार यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोंदू बाबासह तिघं विरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदूबाबा व रेश्मा बुगडे, शामराव बुगडे (रा. मलिग्रे, ता. आजरा) सुनील निऊंगरे कागिनवाडी (ता. आजरा) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याबाबत याबाबत अधिक माहिती अशी की, मलिग्रे तालुका आजरा येथील राहुल पवार ,रेश्मा बुगडे , शामराव बुगडे हे एकाच गावातील रहिवासी असून राहुल याचे बुगडे यांच्या मुलीचे गेले दीड वर्षापासून प्रेम संबंध होते. याबाबत दोघांच्या ही घरी सर्वांना माहिती होती. संबंधित मुलीला प्रियकर राहुल व त्याचे नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तीनी लग्नाची मागणी घालण्यासाठी बुगडे घरी गेले आणि लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र त्याला मुलीच्या घरच्यांनी नकार दिला. काहीतरी कामधंदा कर मग लग्नाचे बघू असे सांगीतले.
दरम्यान, मुलीच लग्न राहुलशी होऊ नये यासाठी सुनील निऊंगरे हा एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोण्याचा प्रकार करू लागले. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरल्याचे फिर्यादीच्या मित्रांनी राहुलला सांगितले. यावेळी राहुल ने काय पुरले पाहण्यासाठी गेला असता तेथे आपला फोटो व मुलीचा फोटो लिंबू व चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य पुरून त्यावर एक अंडे दारू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा २८ आक्टोबरला रात्री ८ वाजता सुमारास कोवाडे मार्गावर रेश्मा बुगडे यांनी मरगुबाई मंदिरच्या साईडला जंगलात जिवंत कोंबडी अंडे व एक काळे बावळे झाडावर मोळा मारून लटकवलेले आढळले यावर राहुल पोवार यांने आजरा पोलिसात जाऊन संबंधितावर तक्रार दिली. यानुसार भोंदूबाबा चौघा विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सह सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.