कोल्हापूर: आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील एका शाळेची विदारक कथा पाहायला मिळत आहे. जागा मालक आणि इमारत बांधणाऱ्यामध्ये वाद असल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या या प्रकरणामुळे गोठ्यातील जनावरे शाळेत आणि शाळेतील पोरं गुरुजीसह झाडाखाली शिक्षण घेत आहेत. एकूणच शाळा बंद पाडण्याचा डाव सुरू असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
एकीकडे पटसंख्येअभावी अनेक शाळा अडचणीत असताना दुसरीकडे सतरा वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेली शाळा समाधानकारक पटसंख्या असूनही केवळ संस्थाचालक, जागामालक व इमारत मालक यांच्यातील वादामुळे अडचणीत आली आहे. सदर शाळेतील मुले अक्षरश झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत. याबाबत शाळा इमारतीच्या मालकाविरोधात रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. सदर शाळा बंद पाडण्याचा डाव सुरू आहे अशी चर्चा आहे.
मुळातच आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिपावसाचा व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. अशावेळी धनगरमोळा येथे सतरा वर्षांपूर्वी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. कालांतराने स्थानिक पालकांनीही या शाळेला उत्तम प्रतिसाद देत आपल्या पाल्याला पाठवण्यास सुरुवात केली.
शाळा अद्याप अनुदानित नसली तरी अनुदानाच्या टप्प्यावर आली असताना अचानकपणे येथील शाळा इमारतीचे मूळ मालक व ज्यांनी इमारत उभा केली, त्यांच्यामध्ये इमारतीच्या मालकीवरून जोरदार वाद सुरू झाले आहेत. हे वाद काहीही असले तरी यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. एकीकडे शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे शासनाकडून सांगितले जातो, तर दुसरीकडे हा वाद सोडवण्यात शासनाचे कारभारी अपयशी ठरल्याने शाळा इमारतीच्या वर्गखोल्यात जनावरे व मुले झाडाखाली अशी परिस्थिती दिसू लागली आहे. अनुदानाच्या टप्प्यावर असणाऱ्या या शाळेला बंद पडण्यामागे एक पद्धतशीर यंत्रणा कार्यरत झाली असल्याचेही आता पुढे येऊ लागले आहे. शासनातील कारभारी या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार की सदर शाळा बंद पाडण्यासाठी हातभार लावणार याकडे आता तालुकावासीयांचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागून राहिले आहे.
काल राज्यातील शाळा सुरू झाल्या. संस्थाचालक आणि जागा मालक यांच्या वादामुळे आम्हाला झाडाखाली शिक्षण घ्यावे लागत आहे. हे दुर्दैव असून प्रशासनाने लक्ष घालावे.- अरुण सावंत, शिक्षक
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









