आजरा पोलीसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/आजरा
ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करून देतो असे सांगून आजरा येथील विजयकुमार पाटील व विलास नाईक यांची 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबतची फिर्याद विजयकुमार पाटील यांनी आजरा पोलीसात दिली आहे. या प्रकरणी भोलाराम रामेश्वर चव्हाण (रा. चिखलागड, ता. मंगरूळपीर, जिल्हा वाशीम) व भारत हिरा राठोड (रा. भिलडोंगर ता. मानोरा, जि. वाशिम) या दोघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, ऑगस्ट 2021 मध्ये पाटील व नाईक यांनी 2021-22 च्या गळीत हंगामासाठी चव्हाण व राठोड या तोडणी यंत्रणा ठेकेदारांना तोडणीसाठी रोख रक्कम 50 हजार व त्यानंतर टप्प्याटप्प्याने असे 8 लाख 60 हजार रुपये दिले. वेळोवेळी यासंदर्भात विचारणा केली असता ऊसतोडणी कामगार देतो असे सांगून त्यांनी सदर पैसे न देता संबधित फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. दोघांविरोधात पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : मान्सूनचा महाराष्ट्राला लवकरच अखेरचा सलाम









