बाळासाहेब उबाळे,कोल्हापूर
Kolhapur Air pollution : कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषण कमी करुन हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या पर्यावरण विभागाला 7 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून 8 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पण या विभागाकडे हवेच्या प्रदूषणाबाबत कोणताही कृती आराखडा नाही. यावरुन महापालिकेचा पर्यावरण विभाग पर्यावरणाच्या बाबतीत किती गंभीर आहे दिसून येते.
देशातील मोठ्या शहरात लाखो वाहने धावतात. या वाहनांतून बाहेर पडत असलेला धूर तसेच हवेत पसरणारे धूलीकण यामुळे हवेच्या प्रदुषणात प्रचंड वाढ होऊन हवेची गुणवत्ता ढासळत आहे.या मोठ्या शहरांच्या पंक्तीत कोल्हापूर शहर जाऊन बसू लागले आहे. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 50 असावा लागतो. पण तो 140 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे पर्यावरणाची परिस्थिती गंभीर होत आहे.
पर्यावरणावर आणि हवेच प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.त्याप्रमाणे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत 7 डिसेंबर 2022 रोजी कोल्हापूर महापालिकेच्या पर्यावरण विभागाला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून 8 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.पर्यावरणाच्या बाबतीत शासनाकडून गांभीर्य दाखवले जात असले तरी महापालिकेच्या पर्यावरण विभागात याबाबत प्रचंड उदासीनता दिसून येत आहे.महापालिकेला प्राप्त झालेल्या या निधीतून शहरातील हवेतील धूलीकण कमी करण्यासह अन्य उपाययोजना करायच्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम समिती यासाठी कार्यरत आहे.वेळोवेळी बैठका घेऊन समितीने उपाय योजना करायच्या आहेत.मात्र निधी येऊन महिना तीन आठवडे होत आले तरी समितीची याबाबत एकही बैठक झाली नाही.उपाययोजना करण्यासाठी कोटयवधींचा निधी आहे,पण पर्यावरण विभागाकडे वेळ नाही अशी परिस्थिती आहे.यामुळे हवेची गुणवत्ता ढासळत जाऊन शहरवासियांच्या आरोग्यावर परिणाम होत राहणार असून महापालिकेला नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसुतकच नाही.
2021 साली प्राप्त 96 लाखापैकी केवळ 20 लाख खर्च
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून 2021 साली महापालिकेच्या पर्यावरण विभागाला 96 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.पण त्या निधीतून दोन वर्षात केवळ कार्यशाळा आणि जनजागृती करण्यावर 20 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.प्रत्यक्षात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतीही कृती झाली नाही.
हेही वाचा- Political : निवडणुकीतील ईर्षा विकासकामातही दिसण्याची गरज
प्रस्तावित कामासाठी 50 लाखाचे नियोजन
96 लाख रुपयांपैकी आतापर्यंत 20 लाख रुपये खर्च झाले आहेत. यानंतर आता गंगावेश येथे कारंजा आणि बिंदू चौकात व्हर्टिकल गार्डनसाठी 50 लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.
समितीच्या बैठकीत दिशा ठरवणार
समितीची बैठक होणार आहे.या बैठकीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून आलेल्या 8 कोटी रुपयांच्या निधीबाबत माहिती देऊन शहरातील हवेचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात दिशा ठरवण्यात येणार आहे.
समीर व्याघ्रांबरे, पर्यावरण अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









