10 प्रकल्पांसाठी 31 कोटींचा खर्च
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिह्यातील 10 सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर झाले आहेत. या माध्यमातून जिह्यात 32 कोटी खर्चातून 510 घरकुलांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये नागरिकांना आपल्या हक्काचे घरकुल मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
दिल्ली येथे 30 मार्च (2022) रोजी झालेल्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत राज्यातील 232 सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील 10 प्रकल्पांचा सामवेश आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिह्यातील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 77, गडहिंग्लज नगरपालिका 40, इचलकरंजी नगरपालिका 40, हुपरी नगर परिषद 40, मलकापूर नगरपालिका 17, वडगाव नगरपरिषद 40, कागल नगरपालिका 63, मुरगूड नगरपालिका 103, जयसिंगपूर नगरपालिका 40, शिरोळ नगरपालिका 50 आदी ठिकाणी एकूण 510 घरकुलांची निर्मिती होणार आहे. या योजनेंतर्गत 300 चौरस फुटांच्या घराची निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख तर राज्य सरकारकडून 1 लाखाचे अर्थसहाय्य केले जाते.
‘सर्वांसाठी घरे 2022′ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने म्हाडा सुकाणू अभिकरण म्हणून कार्य करते. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक नागरी संस्था यांचे एकूण 232 सविस्तर प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय मूल्यमापन समिती आणि राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती व त्यानंतर केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीद्वारे मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.