वाकरे प्रतिनिधी
कुडीत्रे तालुका करवीर येथील कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ११ च्या सुमारास बहुतांशी ठिकाणी ५० टक्के मतदान झाले.
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे येथ मतदान केले. भैरवनाथ विकास सेवा संस्था, मुटकेश्वर या संस्थेच्या नावे त्यांनी मतदान केले. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अजित नरके यांनी स ब खाडे महाविद्यालयात संस्था गटातील मतदान केले. याच ठिकाणी चेअरमन चंद्रदीप नरके यांनी याच ठिकाणी संस्था गटातील मतदान केले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर व विरोधी राजर्षी शाहू पॅनल प्रमुख बाळासाहेब खाडे यांनी सांगरूळ येथे मतदानाचा हक्क बजावला.