ओंकार नवरात्र उत्सव मंडळाचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
कोलगाव निरुखेवाडी येथील ओंकार नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी १५ ऑक्टोबरपासून २४ ऑक्टोबरपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओंकार नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप हळदणकर आणि सचिव विजय टिळवे यांनी केले आहे.
यानिमित्त दररोज सायंकाळी ७:३० वाजता आरती होणार आहे. रविवारी १५, १६, १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता दररोज जिल्ह्यातील निमंत्रित भजन मंडळाची भजने होणार आहेत. बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळा (कवठी) चे नाटक, गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता बुवा गुंडू सावंत (हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे) तबला सागर कदम व पखवाज विराज बावकर आणि बुवा विनोद चव्हाण (लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घोडगे) तबला तुषार लोट व पखवाज परब यांच्यात २०×२० डबलबारीचा जंगी सामनाशनिवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता दांडिया फुगड्या आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम, रविवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता गावातील शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवारी २३ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता नटराज प्रोडक्शन प्रस्तुत विश्वकला मंच निर्मित बहारदार विविध रंगी कार्यक्रम, मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा होणार आहे.









