सावंतवाडी / प्रतिनिधी
Kolgaon Jeerangwadi Mhada Colony’s neglect of water shortage!
कोलगाव झीरंगवाडी येथील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले लागले जात असताना सावंतवाडी पालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे .सावंतवाडी पालिका अधून मधून टँकरने पाणीपुरवठा करते परंतु हा पाणीपुरवठा पुरेसा नसतो .त्यामुळे अनेक दिवस कसा बसे पाणी पुरवून वापरावे लागत आहे. पालिके मार्फत येणारे नळ योजनेचे पाणी सकाळी साडे अकराच्या सुमारास येते. परंतु ते बादली भरेल एवढ्या असते. पाणीपुरवठा पुरेसा नसल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी आश्रयास जावे लागत आहे. नागरिकांनी याबाबत पालिकेला कल्पना देऊनही पालिकेचे दुर्लक्ष आहे या ठिकाणी 15 घर आहेत. परंतु पाण्याचा ठणठणाट आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पाणीटंचाई बाबत नागरिकांना कल्पना दिली .परंतु तेथे मे महिना उलटेपर्यंत थांबा त्यानंतर पाणीपुरवठा सुरवात होईल असे सांगण्यात आले .त्यामुळे महिनाभर उन्हाळ्यात नागरिकांनी कसे राहावे असा प्रश्न पडला आहे शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोड धरण तुडुंब भरले आहे जुलै पर्यंत पाणीपुरवठा होईल एवढा साठा या धरणात आहे असे असताना पाणी मूरते कुठे असा प्रश्न आहे जून नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होतो परंतु उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये या ठिकाणी पाणीटंचाई दरवर्षी जाणवत असते. परंतु , याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे नागरिकात संताप आहे. यंदा शहरात ठीक ठिकाणी पाणीटंचाई आहे परंतु पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाणीटंचाई असल्यास नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करा असे आदेश दिले आहेत. परंतु, याकडेही पालिकेचे दुर्लक्ष आहे त्यामुळे अनुदयात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.









