वृत्तसंस्था/ ऍडलेड
एटीपी टूरवरील ऍडलेड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या थेनासी कोकीनाकीसने पुरुष एकेरीत विजयी सलामी देताना आपल्याच देशाच्या पॉपिरीनचा पराभव केला.
या पहिल्या फेरीतील सामन्यात कोकीनाकीसने पॉपिरीनचा 6-0, 6-7(5-7), 7-5 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळवला. 16 जानेवारीपासून सुरू होणाऱया 2023 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कोकीनाकीसचा पुढील फेरीतील सामना रशियाच्या टॉप सिडेड रुबलेवशी बुधवारी होणार आहे. दुसऱया एका सामन्यात फ्रान्सच्या लिस्टेनीने अर्जेंटिनाच्या कॅचिनचा 6-3, 6-1 तसेच बेल्जियमच्या डेविड गोफीनने कजाकस्तानच्या बुबलिकचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.









