वृत्तसंस्था/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातील सलामीचा फलंदाज विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेमध्ये आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवित झेलांचे शतक पूर्ण केले आहे. असा पराक्रम करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा कोहली हा पहिला क्रिकेटपटू आहे.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात कोहलीने हा टप्पा पार केला. आयपीएलच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तीन क्रिकेटपटूंनी झेलांचे शतक नोंदविले आहे. रविवारी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात कोहलीला फलंदाजीत आपले खातेही उघडण्यात आले नव्हते. विराटने 2023 च्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 46.50 धावांच्या सरासरीने 7 सामन्यातून 279 धावा जमविल्या होत्या. त्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अष्टपैलू किरॉन पोलार्डने 103 झेल तर सुरेश रैनाने 204 सामन्यातून 109 झेल टिपले आहेत.









