वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2024-25 च्या रणजी हंगामातील उर्वरित टप्प्याला प्रारंभ होणार असून 23 जानेवारीपासून राजकोटमध्ये सौराष्ट्र संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी दिल्लीचा 22 जणांचा संघ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे.
विराट कोहली सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील सिडनीच्या शेवटच्या कसोटीत खेळताना कोहलीच्या मानेची शिर दुखावली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. दिल्ली संघाचे नेतृत्व बडोनीकडे सोपविण्यात आले आहे. विराट कोहलीने रणजी स्पर्धेतील आपला शेवटचा सामना 2012 साली उत्तरप्रदेश संघाविरुद्ध खेळला होता. तसेच यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत 23 जानेवारीच्या सामन्यात खेळणार आहे. मात्र त्याने कर्णधारपद स्वीकारले नाही.









