वृत्तसंस्था / डोहा
येथे सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या वेटलिफ्टींग चॅम्पियनशीप स्पर्धेत शनिवारी भारताच्या कोयल बार आणि एल. निलम देवी यांनी 55 किलो युवा आणि कनिष्ठांच्या विभागात रौप्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 6 पदके मिळविली आहेत.
महिलांच्या 55 किलो वजन गटात कोयलने स्नॅचमध्ये 79, क्लिन आणि जर्कमध्ये 103 असे एकूण 182 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकाविले. तर निलमने कनिष्ठ महिलांच्या विभागात स्नॅचमध्ये 86 तसेच क्लिन आणि जर्कमध्ये 104 असे एकुण 190 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या ज्योत्स्ना साबरने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तसेच पायलनेही सुवर्णपदक पटकाविले आहे.









