वारणानगर / प्रतिनिधी
शिवसेनेच्या स्थापनेपासून कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत राहिलेले नतंरच्या घडामोडीत राणे हाच आपला पक्ष अशी निष्ठा, भावना जोपासत आयुष्यभर नारायण राणेचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या स्व. अशोकराव पाटील यांच्या निधनानतंर आज शनिवार (दि. २५ ) रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्नी सौ. राणे यांच्या समवेत पाटील कुटूंबियांचे सात्वन केले.
कोडोली ता.पन्हाळा येथील कोडोली विभाग शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोक शंकरराव पाटील यांच्या दुःखद निधनावेळी राज्यातील बदलती राजकीय परस्थिती यामुळे राणेनां येता आले नव्हते. आज वारणानगर दौऱ्यावेळी प्रथम त्यांनी स्व. अशोकराव पाटील यांच्या घरी भेट देवून कुंटुबियांचे सात्वन केले.
स्वर्गीय पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेत राणे यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला.यावेळी आजपर्यत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून पाटील यांच्या शिक्षण व इतर संस्थाच्या कार्याविषयी आढावा घेवून यापुढे नेहमी आपले सहकार्य राहिल असे आश्वासन दिले.
स्वर्गीय पाटील यांच्या पत्नी श्रीमती अनिता, चिरंजीव अजिक्य व धैर्यशिल, कन्या अमृता, कोडोलीच्या सरपंच गायत्री पाटील, नायब तहसिलदार अस्लम जमादार , मंडल अधिकारी अभिजीत पोवार ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण, तलाठी अनिल पोवार कोडोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन कापरे विद्यमान सदस्य तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









