अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर मुस्लीम पक्ष आक्रमक : हिंदू बाजूकडूनही कॅव्हेट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी संकुल प्रकरणाला गुऊवारी एक नवीन वळण मिळाले. एका हिंदू याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात पॅव्हेट अर्ज दाखल केला. याचदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्षानेही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ज्ञानवापी पॅम्पस प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला. अशा परिस्थितीत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ज्ञानवापी पॅम्पसमध्ये सर्वेक्षण करू शकते. मात्र, या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुस्लीम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुस्लीम बाजूच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला एएसआयला सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर लक्ष घालणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, एका हिंदू याचिकाकर्त्यानेही गुऊवारी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय तातडीने कोणताही आदेश न्यायालयाने जारी करू नये, अशी मागणी संबंधित याचिकाकर्त्याने केली आहे.
वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी 21 जुलै रोजी ज्ञानवापी पॅम्पसमधील वाजुखाना आणि शिवलिंग वगळता इतर भागांचे एएसआय सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात मुस्लीम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने 24 जुलै रोजी एएसआय सर्वेक्षणावर 26 जुलैपर्यंत बंदी घालताना अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयात दोनवेळा झालेल्या युक्तिवादानंतर निर्णय राखून ठेवला होता. तसेच आपण निकाल जाहीर करेपर्यंत एएसआय सर्वेक्षणाला स्थगिती दिली होती. याप्रकरणी गुरुवार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने ज्ञानवापी परिसरात एएसआय सर्वेक्षण करण्यास अनुमती देणारा निकाल जाहीर केला. त्यानंतर दिवसभरात दोन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले असून आता खंडपीठ कोणता फैसला देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.









