शिक्षकांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी
उपायुक्त साधना पाटील यांना निवेदन
कोल्हापूर
काही संघटनाच्यावतीने सामाजिक व धार्मिक तेढ पसरविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये खासगी-सरकारी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संकुलांमध्येही जातीय द्वेष पसरविला जात आहे. जाधववाडी येथील महापालिकेच्या शाळेतही शिक्षिकेला टार्गेट करत अशा संघटनेकडुन शाळेबद्दल जाणून बुजून द्वेष पसरवला आहे. अशा संघटनेवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन मनपा उपायुक्त साधना पाटील यांना समितीच्या शिष्ठमंडळाने दिली. संघटनेमार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरविण्यात आला. विनापरवानगी शाळेत घुसून शिक्षकांना वेठीस धरले. यामुळे शिक्षकांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होत आहे. अशा प्रवृत्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनान म्हंटले आहे की, शिक्षकांकडून कोणताही दुजाभाव केला जात नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनावर व संविधानावर अधारित मुल्ये रूजविण्याचा अधिकार आहे. शासनाने नेमून दिलेला अभ्यासक्रम, प्रार्थना, उपक्रम शाळेत राबविले जातात. सदर प्रार्थना अनेक वर्षापासून शाळेत घेतली जाते. प्रार्थनेचा मुद्दा समोर करून जातीय राजकारण होत असुन यावर वेळीच पायबंद घातला पाहीजे, अशी मागण केली. यावेळी सुधाकर सावंत, गिरिष फोंडे, भरत रसाळे, अनिल लवेकर, आर. वाय. पाटील, विलास पिंगळे, विजय सुतार, संतोष आयरे, उमेश देसाई, राजेंद्र कोरे आदी उपस्थित होते.








