तरुणभारत ऑनलाइन
बऱ्याच वेळेला उभं राहून पाणी पिल्यानंतर तुम्हाला घरातील मोठ्यांकडून ओरडा खावा लागला असेल. पण सध्याच्या धावपळीच्या जगात घाईगडबडीत अनेकजण उभ्यानेच पाणी पिले जाते. अशाप्रकारे उभं राहून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र वेळीच ही सवय मोडणे आरोग्यासाठी गरजेचं आहे… उभ्याने पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणकोणते धोके आहेत हे जाणून घेऊयात…
उभ्याने आणि घाईघाईने पाणी प्यायल्यामुळे सर्वात जास्त परिणाम हा सांध्यावर होतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडून त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते आणि मग हा सांधेदुखीचा त्रास आयुष्यभराचा सोबती होतो. त्यामुळे बसून पाणी पिणं आवश्यक आहे.
उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो.
जेव्हा तुम्ही उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.
उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.
उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण तुम्ही बसून पाणी प्यायल्यास ही प्रक्रिया आराम आणि पचन मोडवर असते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो.









