Health Benefits of Tulsi Tea: आयुर्वेदानुसार तुळस एक औषध वनस्पती आहे, ज्यामध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत.अनेक आजारांमध्ये तुळस फायदेशीर ठरते. जर तुम्ही रोजच्या चहामध्ये तुळशीचा समावेश केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज आपण जाणून घेऊयात तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास आरोग्यास कोणते फायदे होतात.
तुळशीचा चहा प्यायल्याने खोकला असो, सर्दी असो वा दमा यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. यासोबतच तुळशीचा चहा रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो.
अनेक अभ्यासातून समोर आले आहे की, तुळशीचा चहा तणाव दूर करण्यात मदत करतो. तुळशीचा चहा कॉर्टिसोल हार्मोनची पातळी सामान्य करण्यास मदत करतो. यामुळे तणावमुक्त होण्यासोबतच नैराश्य आणि चिंतामध्ये देखील आराम मिळतो.
तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सतत वर-खाली होत राहिल्यास दररोज दुधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीचा चहा प्यायला सुरुवात करा. हे रक्तातील साखरेचा ऊर्जा म्हणून वापर करण्यास मदत करते.
जर तुम्ही तोंडातून दुर्गंधी, हिरड्या सुजणे, दातांमध्ये कॅविटी यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुळशीचा चहा प्या. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे तोंडाचा वास निघून जातो.









