उन्हाळा येताच आपण वेगवेगळी थंड पेये पितो. पण या दिवसात कधीही सब्जाचे पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.
सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकता. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत होते. तब्येत चांगली राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते, सब्जामुळे हे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
पाण्यात सब्जा घालून या पेयाचे नियमित सेवन केल्यास यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर राहण्यास मदत होते.
केवळ आरोग्याच्या तक्रारींसाठीच नाही तर त्वचेसाठीही सब्जा चांगला असतो. हवेतील प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होत असतो. प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. मात्र त्वचेच्या समस्या दूर कऱण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज केल्यास त्वचा चांगली होण्यास मदत होते.
सब्जामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. पाण्यामध्ये सब्जा मिक्स केल्यास या बिया अधिकाधिक पाणी शोषून घेतात. सब्जायुक्त पाणी प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज जात नाही. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्यावर नियंत्रण येते. तसेच यामध्ये असणाऱ्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळेही वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करतो आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले राहण्यास सब्जाचा फायदा होतो. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ कमी करण्यासही मदत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









