बऱ्याच वेळेला उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी सैंधव मिठाचा वापर केला जातो. पण जर तुम्ही त्याचा नियमित वापर केला तर ते अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. कारण सामान्य मिठापेक्षा सेंधा मिठामध्ये जास्त खनिजे आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया सैंधव मिठाचे आणखी फायदे कोणते आहेत.
ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी या मिठाचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत होते.
सैंधव मीठामध्ये असलेले गुणधर्म घशातील दुखणे आणि सूज दूर करण्यात मदत करतात.
या मीठामध्ये असलेले गुणधर्म स्नायू दुखणे आणि पेटके कमी करण्यास मदत करतात. यासोबतच सांधेदुखीपासून आराम मिळण्यासही हे उपयुक्त आहे.
सैंधव मीठामध्ये असलेले खनिजे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते बद्धकोष्ठता,आम्लपित्त आणि पोट फुगणे दूर करण्यास मदत करतात.
स्क्रब म्हणून तुम्ही या मिठाचा वापर करू शकता. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









