जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा पदार्थ सजवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो.पण कोथिंबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे तुम्हाला माहित आहे का? याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.कोथिंबिरीची पाने,देठ,बिया यामध्ये भरपूर पोषक तत्वे आहेत.त्याचसोबत अनेक व्हिटॅमिन्स देखील असतात. जे निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोथिंबिरीचे आणखी कोणते फायदे आहेत.
हिरवी कोथिंबीर तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते.
१. वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त ठरते.यामुळे मेटाबॉलिझम सुधारते.यासाठी रोज सकाळी कोथिंबीरचा रस घ्यावा
२. किडनी डिटॉक्ससाठी कोथिंबीर उत्तम असल्याचे आरोग्य तज्ञ मानतात. याच्या पानांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर आहे, कारण ते इन्सुलिन सोडण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
३.पचनसंस्थेच्या विकारांवर कोथिंबीर अत्यंत परिणामकारक ठरते. अपचन,पोटदुखी,मूळव्याध,पोटात गॅस होणे ,जंत, जुलाब असे पोटाचे विकार होत असतील तर २ चमचे ताज्या कोथिंबीरचा रस ताकासोबत घेतल्यास आराम मिळतो.
४. मासिक पाळीच्या अनेक त्रासांवर एक चमचा धने एक ग्लास पाण्यासोबत उकळून घेतल्यास फायदेशीर ठरतो.
५. कोथिंबीरच्या सेवनाने त्वचा मुलायम राहते. मुरुम आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









