आजकाल प्रत्येकाला केसांच्या समस्या भेडसावत आहेत. मग यावर उपाय म्हणून अनेक महागडे प्रॉडक्ट्स, हेअर मास्क, शाम्पू ,महागडे तेल वापरले जाते.पण तरीही ही समस्या काही कमी होताना दिसत नाही.पण या समस्यांवर जर कडुलिंबाचा कंगवा नियमित वापरला तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.चला तर मग आज कडुनिंबाच्या कंगव्याच्या अधिक फायद्यांविषयी जाणून घेऊया.
कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाविरोधी घटक असतात.यामुळे यापासून बनवलेल्या कंगव्याचा नियमित वापर केल्याने डोक्यातील कोंडा आणि टाळूच्या संसर्ग कमी होतो.
हा कंगवा वापरल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत होते आणि टाळू निरोगी बनतो. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात परिणामी केस गळणे कमी होते.
यामधील मोठ्या लाकडी दाताचा कंगवा वापरल्याने केसांचे तुटणेही मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे ओल्या केसातील गुंता काढताना केस कमी तुटतात. रुंद आणि मोठ्या दातांचा कंघवा केसांना चांगले डिटॅंगल करते आणि केस तुटण्याची समस्याही कमी होते.
तसेच हा कंगवा वापरल्याने टाळूवर असलेले नैसर्गिक तेल केसांमध्ये सर्वत्र पसरते.आणि केस निरोगी आणि चमकदार होतात.
त्याचबरोबर हा कंघवा टाळूमध्ये असलेल्या एक्यूप्रेशर पॉइंट्सला कार्यक्षम बनवतो. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









