ऑलिव्ह ऑइल हा त्वचेच्या समस्यांवर प्रभावी असणारं तेल आहे. त्वचा चमकदार, मऊ, गुळगुळीत आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.याचे अनेक फायदे आहेत . ज्यामुळे आपल्याला तेजस्वी त्वचा मिळू शकते. त्याचबरोबर हे तेल तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते.चमकदार त्वचेसाठी एक कप ऑलिव्ह ऑइलमध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून लावल्यास फायदेशीर ठरते. या तेलाचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
ऑलिव्ह ऑइल हे फॅटी अँसिड आणि अँटि ऑक्सिडंट्ससाठी ओळखले जाते. हे तेल ओलावा लॉक करते, जे हायड्रेशनसाठी उत्तम आहे.
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई सह अँटि ऑक्सिडंट्स असतात. हे अँटि ऑक्सिडंट्स मुरुम किंवा सोरायसिसमुळे होणारा लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी तळहातावर ऑलिव्ह ऑईल घेऊन ते लावा.
ऑलिव्ह ऑइल कोरडी त्वचेवर मॉइश्चरायझरचे काम करते. यामुळे त्वचा मुलायम राहते.
(वरील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौंदर्यतज्ञांचा सल्ला घ्या.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









