उन्हाळा सुरू होताच थंडगार पुदिन्याचा वापर केला जातो. सरबत,रायता अशा अनेक पदार्थांमध्ये पुदिन्याच्या वापर होतो. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. अशावेळी रोज एक कप पुदिन्याचा चहा पिण्याचे आरोग्यास काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
पुदिन्याचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. हा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून वजन कमी होण्यास मदत होते.
पुदिन्याच्या चहामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वास फ्रेश ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही पुदिन्याची पाने देखील चावून खाऊ शकता.
पुदिन्याची पाने स्नायूंना आराम देऊन वेदना कमी करणारे म्हणून काम करतात. त्याच्या पानांमध्ये मेन्थॉल कंपाऊंड असते, जे डोकेदुखी विरोधी गुणधर्म प्रदर्शित करते. या गुणधर्मामुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा चहा बनवून पिऊ शकता. सर्दी आणि फ्लूपासून आराम देण्यासोबतच पुदिन्याचा चहा छातीतील जडपणा कमी करण्यासही मदत करतो.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









