शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. पण यासोबतच शरीरासाठी आरोग्यदायी फळे खाणं देखील महत्वाचं आहे.उन्हाळ्यात तुम्ही कोकमचे शरबत तर नेहमीच पीत असालच. पण कोकम फळाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?आज आपण कोकम फळाबद्दल जाणून घेऊयात.
आपल्या शरीरासाठी नैसर्गिक थंडावा देणारे फळ आहे. एक ग्लास कोकम शरबत आपल्याला उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम देतो. हे रिफ्रेशिंग फळ आपल्याला ऊर्जा देते. हे डिहायड्रेशन देखील प्रतिबंधित करते.
आंबट गोड आणि अत्यंत ताजेतवाने कोकम शरबत आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अँसिडिटी आणि अपचनाचा त्रास असलेल्या रुग्णांना हे ड्रिंक प्यायल्याने खूप फायदा होतो.
कोकममध्ये फायबर भरपूर आणि कॅलरीज कमी असतात. त्यात झिरो कोलेस्ट्रॉल असून, ते एक प्रभावी अँटी ऑक्सिडेंट आहे. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे खनिज असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवते. हे सर्व घटक आपल्या हृदयाचे रक्षण करतात.
मधुमेह ठेवते नियंत्रणातकोकममध्ये मधुमेह नियंत्रणात ठेवणारे गुण आहेत. हे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचा स्राव वाढवते, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होण्यास प्रतिबंध होतो. यामुळे कोकम मधुमेहाच्या व्यवस्थापनात उपयुक्त ठरते.
एक अत्यंत प्रभावी अँटी ऑक्सिडेंट असल्याने हे अँटी एजिंगट्रीटमेंटमध्ये वापरले जाते. ते त्वचेच्या समस्या फक्त दुरुस्त आणि बरे करत नाही तर त्वचा आणि ऊतींचे नुकसान सोडविण्यास देखील मदत करते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









