भारतीय जेवणात बऱ्याच भाज्यांची चव कांद्याशिवाय अपूर्ण राहते. अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. पण खास करून उन्हाळ्यात कोशिंबिरीमध्ये कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो.कांदा खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो. कांदा खाण्याचे आणखीन कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांद्यामध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे उष्णतेपासून तुमचे संरक्षण होते.
कांद्याचा प्रभाव थंड असतो. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी कांदा खाल्ल्याने फायदा होतो. तुम्ही सलाड म्हणून कांदा खाऊ शकता. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो.
कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश नक्की करा.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. पांढऱ्या कांद्यात आढळणारी क्वेर्सिटीन आणि सल्फर सारखी काही संयुगे मधुमेहविरोधी असतात. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









